Posts

वर्तुळ

 #वर्तुळ बापू झोपाळ्यावर बसले होते. जिजी समोर दारात बसून दुर्वा निवडत होत्या. आज चतुर्थी. फाटकाशी गाडी थांबली. फाटक उघडून सुधीर गाडी घेऊन आत आला. “अगबाई, असा अचानक कसा आलास? गेल्या महिन्यात रोहन १२वी पास झाला, तेव्हा तर सगळी येऊन गेलात.” असं म्हणत जिजी लगबगीने उठल्या.  सुधीर आत येऊन झोपाळ्याजवळ मुढ्यावर टेकला. जिजींनी पुढे केलेल्या तांब्यातलं पाणी प्यायला. किरकोळ बोलणं होईपर्यंत जिजींनी चहा करून आणला. “थालीपीठ लावते, आज चतुर्थी आहे, जेवायला जरा उशीरच होईल.”  आज जाऊन गरम थालीपीठ, त्यावर लोण्याचा गोळा घेऊन आल्या. खाऊन झाल्यावर  सुधीर मागच्या अंगणात जाऊन आंघोळ करून आला. इकडचं तिकडचं किरकोळ बोलत वेळ काढत राहिला. त्याची चलबिचल जिजी आणि बापू दोघांच्या लक्षात आली, पण तो आपणहून बोलेल म्हणून दोघं गप्प राहिली.  जेवणं उरकल्यावर बापूंनी थेट विचारलं. थोडा घुटमळला. मग बोलायला लागला. बांध फुटून पाणी वाहावं तसा. रोहनने परस्पर अमेरिकेत कुठल्याशा विद्यापीठात प्रवेश परीक्षा दिली होती आणि १२वीचे मार्क कळवल्यावर त्याला प्रवेश मिळाल्याचं पत्र आलं होतं. तो काही वेगळा विचार करायला तयार...

माझं काही अडत नाही

  बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याचं निमित्त झालं आणि मेंदूत अंतर्गत रक्तस्त्राव होऊन २ दिवसांत मामी गेल्या. घटना धक्कादायक खरीच. पण शेजारी, नातेवाईक यांनी आधार देऊन सगळं करवून घेतलं. १५ दिवस राहून मुलं आपापल्या घरी गेली. आणि हरिभाऊ एकटे राहिले. ४५ वर्षांचा सहवास, नाही म्हटलं तरी चुकल्या-चुकल्यासारखं झालंच त्यांना. कामाच्या बायका नियमित येत होत्या. महिनाभरात हरिभाऊंचा दिनक्रम पूर्ववत सुरु झाला. धुण्याचं मशीन लावण्याचं काम वाढलं, पण ते तसं सोपं होतं. भांडी किरकोळ असायची. ती स्वयंपाकाच्या बाई घासायच्या. एका माणसाचं काम कमी झालंय तर त्याऐवजी हे करा असा युक्तीवाद करून हरिभाऊंनी त्याची सोय करून टाकली. आत्तापुरतं तरी मिटलं म्हणून ते निवांत झाले. त्याच महिनाभरात केर-लादीच्या बाईंनी २-३ दांड्या मारल्या. हरिभाऊ वैतागले. त्यांना हटकलं तर त्यांनी आवाज वाढवला. “दुसरी बाई बगा तुमी, वयनी कवा काय बोलल्या नाय मला.” गप्प बसले. पुढच्या महिन्यात वीज कापली गेली. त्यांनी घाबरून मुलांना फोन केला. मोठा आला २ दिवसांनी. तोपर्यंत मेणबत्त्या, मोबाईल टॉर्च यावर भागवलं. मुलाने आईचे ड्रॉवर्स धुंडाळले. वीज बिला...

शॉक ट्रीटमेंट

 #शॉक_ट्रीटमेंट  अपघाताची बातमी कळताच मामींचा मोठा मुलगा मिळालेल्या पहिल्या फ्लाईटने अमेरिकेत पोचला. त्याचा धाकटा भाऊ आणि भावजय गाडीच्या भीषण अपघातात जागीच गेले होते. १४ वर्षांची मुलगी सारा घरी होती, ती वाचली. पोलीस आणि इतर कायदेशीर बाबी पूर्ण करण्यात दीड-दोन महिने गेले.  मित्रमंडळींनी खूप मदत केली. अपघातात आईवडील गमावलेली सारा नाईलाजाने काकाबरोबर भारतात आली. आजी आणि काका-काकू तिला मुळीच आवडत नसत. जुनी, बुरसटलेल्या मतांची टिपिकल भारतीय मनोवृत्ती असं वाटे तिला. नाही म्हणायला तिचा चुलत भाऊ भास्कर जरा बरा वाटायचा. हुशार होता, व्हरनॅक भाषेत शिकूनही उत्तम इंग्लिश बोलायचा. ॲक्सेन्ट टिपिकल होता, पण शब्दभांडार उत्तम होतं. दिसायलाही बरा होता, अगदी भारतीय फिल्मी हिरोसारखा. आत्ता परिस्थितीने तिच्यासमोर काही पर्यायच ठेवला नव्हता, यावंच लागलं तिला. भारतात येऊन पुन्हा सरकारी सोपस्कार.  तिच्या वडिलांची संपत्ती विकून आणि विम्याचे आलेले पैसे या सगळ्याची तिच्या नावाने योग्य ती गुंतवणूक करण्यात ५-६ महिने गेले. दरम्यान इथल्या उत्तम शाळेत तिचं नाव घातलं,  तिच्यासाठी आजीच्या खोलीत स्...

पोचपावती

 #पोचपावती  मामींचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा छान पार पडला. जवळची मोजकी माणसं, मुलासुनेचं नेटकं आयोजन. सोहळा झाल्यावर मंडळी निवांत गप्पा मारत होती. “काही म्हणा आत्या, उदयभाऊजी फार प्रेम करतात तुमच्यावर. किती काळजी घेतात. साठी, पंचाहत्तरी पण किती छान केली होती.” मामींच्या भावाच्या सुनेने कौतुक केलं उदयचं. “होय गं, उदय आणि नीलिमा दोघं अगदी जपतात, सांभाळतात मला. आता आज बघ ना, उदयने बाहेरची कामं केली आणि नीलिमाने घरची खिंड लढवली. कुठे काही बोट दाखवायला जागा नाही.” मामींची बहीण म्हणाली, “नवऱ्याच्या कामात बायकोचा हात लागतोच हो.” “म्हणून तर संसार तीराला लागतात लोकांचे, ” मामी म्हणाल्या. “सगळ्याच बायकांचा हात असतो गं, दिसतोच तो. पण तो दिसला असं म्हणावं आपण. काय बिघडतं? करणारा काही अपेक्षेने करत नाही, पण कौतुकाचा एखादा  शब्द द्यावा त्यांना. जीव सुखावतो, कष्टांचा विसर पडतो. आपलं म्हणून करतात ना, मग आपल्यांचं कौतुक आपणच करावं की.” नीलिमाचे डोळे भरून आले. आपली सासू किती विचारी आणि समंजस आहे याचा आणखी एक प्रत्यय आला होता तिला. ->>सत्कार नकोत, पण एखादा शब्द पोचपावतीचा अवश्य खर्च कराव...

गुंतवणूक

 #गुंतवणूक दहा वाजत आले. घर सामसूम झालं. आपापल्या कामाला, शाळा-कॉलेजला बाहेर पडले सगळे. आता ४ वाजेपर्यंत मामी एकट्याच असणार होत्या घरात. चहाचा कप घेऊन बाहेर बाल्कनीत येऊन बसल्या. तो समोरच्या चाळीतली अनू सोसायटीत शिरतांना दिसली. “परत काहीतरी भांडण झालेलं दिसतंय..” घरात फार चिडचिड झाली की अनू मामींजवळ येऊन आपलं मन मोकळं करीत असे. त्या ऐकून घ्यायच्या, कधी तिला काही समजवायच्या. अनूसाठी दार उघडून मामी पुन्हा बाल्कनीत येऊन बसल्या. “मामी, एक अडचण आलीय.” “काय गं झालं?” मग तिने सविस्तर सांगितलं. नोकरी करणं तिच्या नवऱ्याला मान्य नव्हतं. ती शिकलेली नव्हती फार. म्हणजे कुठे घरकाम, किंवा पोळी भाजी केंद्रावर काम करावं लागलं असतं. पण १-२ गैरप्रकार ऐकल्यापासून त्याचं पक्कं मत होतं की बायकोला बाहेर कामाला पाठवायची नाही. मग करायचं काय? काही खाद्यपदार्थ करण्याइतकी सुगरण नव्हती. घरापुरतं करायची. पण एका शिंप्याकडून हातशिलाईचं काम मिळायचं. त्यावर हात बसला होता. सुबक असायचं काम. आता तो सांगत होता, फॉल पिको पण कर. फॉल तर हाताने शिवता येईल, पण पिकोचं मशीन घ्यावं लागेल. “तो म्हणतोय, मी घेऊन देतो, तू सवडीने फ...

नथ

लग्न थाटात पार पडलं रोहितचं. कुलाचार झाले. आता उद्या सकाळी तो आणि त्याची बायको मधुचंद्राला जाणार, त्याची तयारी सुरू होती दोघांची. मामी झोपायच्या तयारीत होत्या. तो नवी नातसून, रश्मी, खोलीत आली. तिच्या पाठून मामींची सूनही आली. हातातली नथीची डबी रश्मीने मामींना दिली. “अगं, मला का देत्येस? सासूजवळ दे तुझ्या. तुला दिली ना मी ती.” रश्मी क्षणभर घुटमळली. मग हळुवार म्हणाली, “आजी, तुम्हाला दुखवायचं नाही, म्हणून लग्नात आणि नंतर दोन दिवस घातली मी नथ. पण.... मला नाही आवडत इतकी मोठी नथ. तुमची नथ पेशवाई थाटाची, अगदी घसघशीत आहे. इतकी मोठी नथ घालून वावरणं शक्य नाही मला आता. म्हणून परत देतेय. तुम्ही दुसऱ्या कुणाला दिलीत, तर हौसेने वापरली जाईल. मी काय लॉकरमध्ये ठेवणार. त्यापेक्षा.....” मामींनी सुनेकडे पाहिलं. तिचा चेहरा पडला होता. खाली मान घालून गप्प होती. रश्मीच्या चेहऱ्यावर अगदी मृदू, आर्जवी भाव होते. मामींनी घेतली नथ. तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाल्या, “बरं. जाऊन फिरून या. सांभाळून जा हो.” ३-४ दिवस मामी गप्प होत्या. सून आवराआवर करतांना त्यांच्याकडे लक्ष ठेवून होती. नथ त्यांच्याजवळच होती. दिली नव्हत...

बिझनेस_असोशिएट

विक्रम - बड्या उद्योगपतीचा एकुलता एक मुलगा. नुकताच शिक्षण पूर्ण करून वडिलांबरोबर व्यवसायात उतरलेला. मधुरा - व्यवस्थापन प्रशिक्षण घेतलेली, हुशार, अचूक निर्णयक्षमता असलेली मुलगी. विक्रमच्या वडिलांनी त्याच्या पहिल्या प्रोजेक्टवर मधुराची त्याची बिझनेस असोशिएट म्हणून नेमणूक केली तेव्हा तो थोडासा नाराज झाला. त्याच्या डोळ्यासमोर सिनेमात पाहिलेल्या नखरेल, चटपटीत, चंट मुली होत्या. ही सलवार-सूट घातलेली, वेणी वळलेली मुलगी त्याला अजिबात आवडली नाही. पण त्याच्या वडिलांचा माणूस पारखण्याच्या आपल्या कलेवर पूर्ण विश्वास होता. "थोडे दिवस काम करून बघ, तुला ती अगदीच नाही पटली तर तिला जायला सांगणं कठीण नाही. ती काही आपली कर्मचारी नाही. कॉन्ट्रॅक्ट आहे. थोडी भरपाई दिली आणि जा म्हटलं. अगदी सोपं." तो गप्प बसला.  कामाला सुरूवात झाली आणि विक्रम चकित होत गेला. कोणत्याही मुद्यावर दहा प्रचलित गोष्टींबरोबर काहीतरी वेगळा मुद्दा तिला सुचायचा. वेगाने आणि अचूक निर्णय घेण्याचं तिचं कसब तर त्याला अचंबित करत होतं. एक दिवस त्याने मनाशी कबूल केलं की 'बाबांची निवड योग्य आहे'. काम सुरु होतं. एक दिवस त्याने ति...