Posts

Showing posts from September, 2026

ज्याचं_त्याचं_स्वातंत्र्य

  रविवारची आळसावलेली सकाळ. मुलं अजून उठलीच नव्हती. साडेनऊच्या सुमाराला स्वयंपाकाच्या बाई आल्या आणि घरात जरा जाग आली. भांड्यांचे आवाज, फोडणीचा दरवळ झोप उडवून गेला. १० वाजता टेबलाशी सगळ्यांची हजेरी लागली-नाश्त्यासाठी. खाणं-पिणं झाल्यावर शामला बाई म्हणाल्या, “जाऊ नका कुणी. मला काही बोलायचंय.” भुवया उंचावल्या गेल्या.  “१ तारखेपासून मी ‘निवृत्ती’ वृद्धाश्रमात राहायला जायचं ठरवलंय.” जे ऐकलं त्याचा अर्थ कळायला ५-७ सेकंद लागली सगळ्यांना. नंतर एकदम सगळे काहीतरी बोलायला जाणार तर शामलाबाईंनी त्यांना हाताने थांबवलं. “माझं बोलून व्हायचंय.  बँकेतून निवृत्त झाले तेव्हा बँका नुकत्याच computerised झाल्या होत्या. मला ट्रेनिंगला पाठवलं होतं बँकेने. मी सगळं शिकले, अजूनही वापरते लॅपटॉप. स्मार्टफोन तर आता गरजच झालाय. त्यामुळे नीट चौकशी करून, शोध घेऊन, सगळी माहिती घेऊनच मी हा आश्रम निवडलाय.  आता हा निर्णय का घेतला... २० ते ५५ वयोगटातली तुम्ही ४ माणसं. आपल्या ‘पर्सनल स्पेस’मध्ये किंवा ‘स्वातंत्र्या’त काहीही अडथळा नको असतो तुम्हांला. जराही तडजोड, समजून घेणं मान्य नसतं. ठीक आहे, तो तुमचा विचा...