Posts

Showing posts from October, 2020

हिरॉईन

 हिरॉईन   रात्रीचे दहा वाजले. मॉलचं शटर बंद झालं. मॉल असं स्टाफ आणि येणारे कस्टमर म्हणायचे पण खरं तर ते ३-४ गाळ्यात थाटलेलं डिपार्टमेंटल स्टोअरच होतं. मध्यमवर्गाला नियमित लागणाऱ्या किराणा, भाजीपाला, चॉकोलेट्स, आईस्क्रीम, कॉस्मेटिक्स, खेळणी, शाळेची स्टेशनरी, इतर गृहोपयोगी वस्तू असा माल खचाखच भरलेला. मध्यमवर्गीय वस्ती गच्च होती भोवताली. त्यामुळे स्टोअर अगदी जोरात चालत होतं. सणासुदीला तर जेवायला फुरसत नसायची. दिवाळीला घसघशीत बोनस, वर्षातून एकदा जेवण, शिवाय चार जोडी युनिफॉर्म, परफॉर्मन्स इन्सेंटीव असं सगळं देत होती कंपनी. मुंबईत ५-६ स्टोअर्स होती. धंदा उत्तम होता. १०वी पास झालेली मुलं-मुली लहान वयात स्वत:च्या पायावर उभी राहू शकतात हा मोठाच फायदा मॉल संस्कृतीचा. साडेनऊपासूनच गर्दी हळूहळू कमी झाली होती. दिवसभराचा हिशेब शोभाने करून ठेवला होता. शटर पडल्याबरोबर ती चेंज रूममध्ये गेली. मॉलचा युनिफॉर्म बदलून आपला सलवार कमीज चढवला, केस सारखे करून पावडर कुंकू केलं आणि पर्स उचलून बाहेर पडली. झपाझप स्टेशनच्या दिशेने जातांना मनोमन प्रार्थना करत होती, गाडी चुकू नये म्हणून. त्या गाडीला ‘तो’...