ती
'ती' .....
(सत्यकथेवर आधारित)
(सत्यकथेवर आधारित)
ती तशी फार हुशार नव्हे, पण मेहनती आणि निश्चयी. जे ठरवलं ते जीवापाड मेहनत
करून साध्य करायचं. १२वी ची मेहनत फळाला आली. इंजिनियरिंगला प्रवेश मिळाला.
पुढची ४ वर्षं रात्रीचा दिवस करून केलेला अभ्यास यश घेऊन आला. कॅम्पस इंटरव्ह्युमध्ये
चांगल्या कंपनीत निवड झाली. आणि पुढे कंपनीने अॅडव्हान्स ट्रेनिंग
साठी अमेरिकेत पाठवलं. इथपर्यंत सगळं सुरळीत हवं तसं पार पडलं. फारसे
काटेकुटे नाही लागले रस्त्यात.
तिकडे 'तो' भेटला. जाती वेगवेगळ्या असल्या तरी तिकडे कोण विचारतंय
असल्या गोष्टी. तोही शिकलेला. जमीनदार घराण्यातला. घरच्यांचा विरोध
डावलून तिकडेच लग्न केलं. पहिलं वर्ष सुरळीत गेलं आणि नंतर त्याला
घरचे फोन यायला लागले. तो अस्वस्थ व्हायला लागला. काय बोलणं होतंय ते तो
सांगत नव्हता पण फोन येऊन गेला की अस्वस्थ व्हायचा. तिला चौथा महिना लागलेला
असतांना एक दिवस आई आजारी असल्याचा फोन आलाय असं सांगून तो सुटी
घेऊन निघून आला. महिनाभर फोन नियमित आले. आईची तब्येत सुधारतेय म्हणायचा. मग
हळू हळू फोन कमी होत होत एक दिवस बंद झाले. तिचे फोनही लागेनात. 'chk
the no. you have dialled' अशी टेप ऐकू यायला लागली. त्याने बहुतेक सिम कार्ड नवं
घेतलं. त्याच्या कंपनीत चौकशी केली तर जातांनाच तो राजीनामा देऊन
गेल्याचं कळलं. बँक खातंही बंद केलेलं आढळलं. आणि सातवा पूर्ण होण्याच्या
सुमाराला ती समजून चुकली, आजपर्यंत ऐकलेल्या अनेक
किश्श्यांचा प्रकार आपल्या बाबतीतही घडलेला आहे. त्याने आपल्याला फसवलंय. तो
आता परत येणार नाही. तिला फार मोठा धक्का बसला. पण तिकडच्या भारतीय
मैत्रिणींनी तिला आधार दिला, सांभाळलं. नववा अर्धा झाल्यावर ती बाळंत
झाली. मुलगा झाला. या काळात तिने खूप विचार केला. सगळ्या घटनांचा आढावा
घेतला. आपण नेमक्या कुठे चुकलो ते शोधायचा प्रयत्न केला. पण 'नियती' या एकाच उत्तरावर ती
सतत येऊन थांबत राहिली. हळूहळू तिचा निश्चय होत गेला. आणि ती
एका ठाम निर्णयावर येऊन पोचली. मुलगा दहा दिवसांचा झाल्यावर तिने
आपल्या घरी फोन केला.
सगळी हकीकत सांगितली. आपला निर्णय चुकल्याचं
मान्य केलं. "मला आत्ता तुमच्या आधाराची, मदतीची गरज आहे आई. याल का? मी तिकीटं पाठवते.
एखाद्या एजंटकडून विसा करून घ्या लगेच. सगळा खर्च मी पाठवते.
पैसे आहेत माझ्याकडे पुरेसे. पण मला आत्ता त्याच्यापेक्षा महत्त्वाचं असं
काहीतरी हवंय." दोन वर्षं आवरून ठेवलेलं मन अनावर झालं, केलेला निर्धार मागे
सारुन माया मोठी ठरली. आई-वडील पोचले अमेरिकेला.
अडीच-तीन वर्षांचं साचलेलं बोलणं झालं. चुका कबूल करून झाल्या. दोनेक महिन्यांनी
आई-वडिलांनी तिला विचारलं, "पुढे काय करायचंय आता?"
तिने सांगितलं, मी आता इथेच राहणार आहे. मुलाला माझं नाव लावीन. इथे नाही कुणी काही प्रश्न विचारत.
"अगं, पण एकटी कशी राहशील? जन्मभरासाठी सोबत नको का कुणाची?"
"एकदा शोधली. नाही माझ्या नशीबात ते हट्टाने मिळवायचा प्रयत्न का करू?" आई-वडिलांनी खूप समजावलं. पण तिने नाही मानलं. अखेर आई-वडील परत यायला निघाले. ते किती दिवस इकडचा पसारा सोडून राहणार? आणि त्यांच्या निघायच्या ४-५ दिवस आधी 'तो' दारात येऊन उभा राहिला.

आईच्या हट्टासाठी तिच्या माहेरच्या नात्यात कोणा मुलीशी लग्न केलं,
पण ती वेडसर निघाली.
इथल्या जुन्या मित्रांशी संपर्क होताच. मुलगा झाल्याचं
कळल्यावर त्याला राहवलं नाही. वेडसर बायकोशी संसार शक्य नाही,
निदान आपला मुलगा
तरी मिळावा. आपल्या आणि आई-वडिलांच्या जगण्याला थोडा तरी आधार.
आई-वडिलांनी त्याला हाकललाच. तिकीटं रद्द केली.
"नाही द्यायचा बाळाला त्याच्या ताब्यात. माणूस आहे का हा? फसवणूक करून वर ही मागणी? पोलिसात तक्रार कर तू."
पण ती शांत होती. एकदा खाल्लेल्या ठेचेने तिला शहाणं केलं होतं. आता पुन्हा कोसळून चालणार नव्हतं. २-४ दिवस विचार करून पुन्हा एकदा तिने आई-वडिलांच्या मनाविरुध्द निर्णय घेतला. एकटीने मूल सांभाळणं सोपं नाहीच. मुलाची फरफट. तिकडे घर भरलेलं. जमीनदार-माणूसबळ भरपूर. इथे फक्त मी. तिथे किती माणसं प्रेम करणारी. एक पालक अायुष्य आहे त्याच्या वाट्याला, तर ते जरा भरल्या घरात जाऊ दे. वर्षातून एकदा २ महिने मुलाला तिच्याकडे राहायला पाठवायचं कबूल करून घेतलं तिने. कायदेशीर कागदपत्र करण्याची मागणी केली. सगळे सोपस्कार उरकून सगळी भारतात आली. इथे नामांकित वकील गाठून इथले कायदे तिला कसं संरक्षण देतील ते जाणून घेतलं. आणि मुलाला घेऊन सगळी त्याच्या गावी पोचली. सासू - हो सासूच ... कारण लग्न कायदेशीर होतं आणि घटस्फोट नव्हता झालेला अजून - हाडांचा सापळा झाली होती. म्हणजे खरंच आजारी असावी. हिला पाहून हिचे पाय धरले.
"कोणताही गुन्हा नसतांना तुझं आयुष्य उधळलं गेलं मुली. माझ्या कातड्याचे जोडे करून घातले तुझ्या पायात तरी तुझे उपकार फिटायचे नाहीत. पोटचं मूल दुरावणं काय असतं त्याचा अनुभव घेतलाय मी. तरी तुला ढकलतेय या खाईत. कुठे फेडू माझी पापं?"

पण ती शांत होती. मुलगा त्यांच्या ओटीत घातला. आणि कुणाशीही एक
अक्षरही न बोलता पाठ फिरवून बाहेर जाऊन गाडीत बसली. २ दिवस थांब म्हणून तो,
त्याची आई अक्षरश:
हातापाया पडले, पण ती बधली नाही. तिची आई तर अवाक् झाली होती आपल्या मुलीचं वागणं
बघून.
मुंबईला येऊन त्याच रात्री ती परत निघाली. पुन्हा एकदा विनवण्या.
"आली आहेस तर रहा थोडे दिवस. शिकलेली आहेस. नोकरी काय,
मिळेल दुसरी. अशी
नको जाऊस दुखऱ्या मनाने." पण तिने आपलं काळीज
जणू दगडाचं केलं होतं. विमानतळावर आपली बॅग घेऊन ती आत शिरली आणि मागे
वळूनही न बघता दिसेनाशी झाली.
आकाशात झेपावलेल्या विमानाच्या खिडकीतून खालची चकाकती मुंबई बघतांना
तिने आणखी एक निर्धार केला. आता मागे वळून बघणं नाही.
सुटली ही माती कायमची. करार केलाय, तो त्याने पाळला तर ठीक, नाही पाळला तरी
आपल्या पायाखालची वाट आपण घट्ट पकडून ठेवायची. ती सुटू द्यायची
नाही पायाखालून. नव्या प्रयत्नांसाठी नवा निर्धार. पुन्हा एकदा.
हेही जमेल आपल्याला याची खात्री होती तिला.
जमलं पाहिजे - जमवलं पाहिजे.
Comments
Post a Comment