वणवा
वणवा!
रविवारची सकाळ. लांब
पल्ल्याची सिटी बस.
फार गर्दी नाही पण
रिकामीही नाही.
सुरुवातीच्या stopवर एक प्रौढ बाई
चढली. नंतर एका stopवर एक १७-१८ वर्षांची तरुण मुलगी.
अल्ट्रा मॉड.
चेहऱ्यावर रंगरंगोटी.
समोरच्या बाजुला
उलट्या दिशेने तोंड करून असलेल्या बाकावर बसून मोबाईलमध्ये डोकं.
बाईचं लक्ष वारंवार
त्या मुलीकडे जात होतं.
त्या मुलीला ते
जाणवलं.
ती उठून बाईच्या
शेजारी येऊन बसली.
कुजबुजत्या स्वरात
.... “काय झालंय? अशा का बघताय? काही कुठे बटण उघडं राहिलंय, ड्रेस फाटलाय, काही डाग वगैरे
पडलाय का?”
बाईने नकारार्थी मान
हलवली.
आता स्वर खालचाच, पण जरा रागीट....
“मग अशा का पाहताय
माझ्याकडे?”
“जे दिसतंय ते
पाहतेय.”
“म्हणजे?”
“........???”
“एक बाई असून तुम्ही
अशा बघताय, मग पुरुषांनी बघितलं तर काय नवल?”
बाई अत्यंत शांतपणे
..... “मी तोच विचार करतेय मगापासून. मी बाई असून माझी नजर ढळत नाही तुझ्यावरून.
बसमधल्या पुरुषांचं काय होत असेल?”
“बाईच बाईची शत्रू
म्हणतात ते खोटं नाही.”
“बरोबर आहे.”
मुलगी जळजळीत नजरेने
बाईकडे बघत उठली.
बाईनी तिचा हात धरुन
बसवली परत. “बाईबद्दलचं सुप्त आकर्षण मनात पेरुनच पुरुषाला जन्माला घालतो निसर्ग.
जे शिकतात, संस्कारित होतात ते मन आणि नजर आवरतात. पण दुर्दैवाने काही मडकी
कच्ची राहतात. पुरेसे संस्कार नाही होत त्यांच्यावर. अंगभर कपडे घातलेल्या शालीन बाईकडे
पण ते विखारी, विकृत नजरेनेच बघतात. अशात त्यांच्या असंस्कारित
मना-नजरांना उसळवणारं काही आसपास असलं की त्यांच्या डोक्यात वणवा पेटतो. तो वणवा सहजी
विझत नाही. कोणा ना कोणा स्त्रीला तो जाळतोच. तेव्हा इतर काही कळत नाही, कळतं फक्त तिचं बाईपण.
ठिणगी टाकणारी अनभिज्ञ असते तिच्या वागण्याच्या परिणामांबद्दल. जी बळी जाते, तिचा आक्रोश...माझं
काय चुकलं? एक बाईच दुसऱ्या बाईची शत्रू ठरते ती अशी.”
Comments
Post a Comment