ललित साहित्य - ललित लेखन


ललित लेखन - ललित लेखन

ललित लेखन म्हणजे काय ते सांगा असं एका फेबु मित्राने सुचवलं म्हणून हा लेख -

लेखनाच्या अनेक प्रकारात ललित लेखन हा लोकप्रिय प्रकार आहे. मराठीतल्या प्रणय कादंबरीचे प्रणेते ना, सी. फडके या साहित्य प्रकाराचे जन्मदाते असं म्हटलं तर चूक ठरु नये. याआधी लिहिलं गेलंच नाही असं नसेल पण ललित लघुलेख हा प्रकार फडक्यांनी लोकप्रिय केला.

कोणत्याही विषयावरची तांत्रिक माहिती न देता, किंवा ती माहिती देतांना सुध्दा थोडं भावनिक अंगाने लिहिलं की ते ललित होतं. उदा. स्त्रीच्या बाळंतपणाबद्दल लिहितांना गर्भधारणा, गर्भाची वाढ वगैरे तपशील दिले तर तो प्रसुतीविषयक माहिती देणारा लेख होतो. पण तोच 'बाळाची चाहूल', 'डोहाळे' अशा शीर्षकांनी लिहिला आणि त्यात बाईची बदलती मानसिकता, तिचे बदलते रुप, गर्भाच्या वाढीबरोबर बदलणारं तिचं रोजचं आयुष्य यांचं वर्णन केलं की तो ललित लेख.

मी काश्मीरला गेले तर कशी गेले, बुकिंग कसं केलं, कोणत्या कंपनीबरोबर गेले, कुठे राहिले, कशी फिरले, खर्च किती आला वगैरे माहिती हे प्रवास मार्गदर्शन होईल. पण काश्मीरचं सौंदर्य, तिथला वेगळेपणा, तिथल्या संस्कृतीमधील आवडलेल्या/नावडलेल्या गोष्टी यांच्याबद्दल मी काही लिहिलं तर तो ललित लेख.

चराचर सृष्टीतील कोणताही विषय ललित लेखाला वर्ज्य नाही. चंद्र हा सर्वात लाडका विषय. नंतर तरुण स्त्री, तान्हे बाळ वगैरे. मराठी भाषेतील उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, अतिशयोक्ती वगैरे अलंकारांनी याला सजवतात. पण एखादाच ठळक दागिना घातलेली सौंदर्यवती आणि दागिन्यांच्या दुकानातली दागिन्यांनी मढलेली निर्जीव बाहुली यांच्यात जो फरक तो या अलंकारांच्या वापरातही. मोजके आणि नेमके अलंकार लेखाचं सौंदर्य आणि रोचकता वाढवतात. आणि प्रमाण जास्त झालं की मूळ विषय काय ते कळेनासं होतं.

माझा हा लेखही 'ललित-माहितीपर' प्रकारात मोडतो. कारण ललित म्हणजे काय याची माहिती मी दिली आहे. पण लेख कसा लिहावा त्याबद्दल मी काहीही लिहिलेलं नाही. सुरुवात कशी असावी, विषय कसा फुलवावा, शेवट कसा करावा, शब्दसंख्या किती असावी याच्या सूचना दिल्या तर तो लेखनविषयक मार्गदर्शन करणारा लेख ठरला असता. (ही फारच ढोबळ माहिती आहे. परीक्षेसाठी जरा अधिक तपशील अभ्यासावे लागतात. पण ललित लेख म्हणजे काय या प्रश्नाचे हे माझ्या मते यथोचित उत्तर ठरावे. 


राधा मराठे
०१.०६.२०१७ Top of Form

Comments

  1. ह्या छान माहिती बद्दल धन्यवाद 👌✍️🙏🙏

    ReplyDelete
  2. खूप छान...धन्यवाद

    ReplyDelete
  3. खुप छान माहिती

    ReplyDelete
  4. खुप छान आहे लेख .

    ReplyDelete
  5. छान माहिती. मी माझा ब्लॉग बनविला आहे: https://charudattasawant.com/
    माझे लिखाण ललित प्रकारात मोडते का किंवा कसे ह्याची माहिती कोणी देऊ शकेल का?
    धन्यवाद.

    ReplyDelete
    Replies
    1. तुमचे संपूर्ण साहित्य मी वाचले आहे. तुमचा साहित्य प्रकार हा ललित लेखनाशी संबंधित आहे.

      Delete
  6. Mhanje kontayhi lekhala bhavnik sparsh dene,barobar ka?

    ReplyDelete
  7. छान माहिती

    ReplyDelete
  8. छान माहिती

    ReplyDelete
  9. फार छान माहिती दिली आहे, धन्यवाद

    ReplyDelete
  10. खुप-छान-माहिती !
    ललित साहित्याची थोडक्यात पण चांगली माहिती दिलीत.
    उदाहरण म्हणून मराठी साहित्यातील ललित लेखक आणि त्यांच्या पुस्तकांची नांवं दिलीत तर बरे होईल.

    ReplyDelete
  11. धन्यवाद! अनेकदा ललित लेख असं ऐकलं होतं. पण आज निट समजले

    ReplyDelete
  12. ललित कथेला जीवंत पणा कशा प्रकारे
    मीडते
    Plz answer me my exam Questions
    Plz send me answer

    ReplyDelete
  13. थोडक्यात आणि सर्वोत्तम माहिती दिली आहे. खूप खूप धन्यवाद

    ReplyDelete
  14. काय भाषा, काय साधेपण काय ती समजावण्याची पद्धत समदच ओके मधी ललित लिखाणाबद्दल समजलं ढोबळ मानाने

    ReplyDelete
  15. मी देखील ललित या प्रकारात मोडतील असे लेख लिहिण्याचा प्रयत्न करतेय,
    blogbyrutujanaik.blogspot.com
    हि माझ्या page ची लिंक आहे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

ललित साहित्य - कथा

दुसरं लग्न